शहरातील खत दुकानदारांकडे सकाळी आठपासून खतासाठी शेतकरी रांगा लावत आहेत . कोणत्या दुकानावर खत मिळेल अथवा कुठे खत उपलब्ध आहे , अशी विचारणा करत सातपुड्यातील शेतकरीदेखील गर्दी करत आहेत एकीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्याचा दावा करतो , मात्र दुसरीकडे शेतक - यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे . ही वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही . त्यामुळे तालुक्यात मुबलक प्रमाणात यूरिया व इतर खते उपलब्ध व्हावीत , अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत .
तळोदा तालुक्यात १८ हजार १०५ हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे . यात शेतकरी ज्वारी , बाजरी , मका , तूर , मूग , उडीद , भुईमूग , सूर्यफूल , सोयाबीन व कापूस पिकाची लागवड करतात .
या वेळी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे . १५ जूनपर्यंत खरिपाची पेरणी दोन हजार हेक्टरपर्यंत पूर्ण झाली होती . आता जुलै उजाडला असल्याने पाऊसदेखील बऱ्यापैकी झाल्याने पेरणी जवळपास आटोपली आहे .
Comments
Post a Comment