Skip to main content

नंदूरबार मध्ये रविवारी कडक : संचारबंदी

 • रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत कडक संचारबंदी 
• सकाळी ९ वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना अनुमती 
• वैद्यकिय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे सुरु सर्व प्रकारची दुकाने , पेट्रोलपंप आदि आस्थापना या दिवशी बंद अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी

जिल्हाधिकारी  -  डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन.

Comments

Popular posts from this blog

आज 308 व्यक्ती कोरोनामुक्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ नंदुरबार ( जिमाका वृत्तसेवा ) दि . 3 : सप्टेंबर 2020

कोरोनाबाधिताना वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून आज दिवसभरात 308 बाधित उपचाराअंती बरे होऊन घरी परतले . बुधवारी देखील 123 बाधितांना कारोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते . जिल्ह्यात आतापर्यंत 2833 कोविड पॉझिटीव्ह आढळले असून त्यापैकी 1706 बरे झाले आहेत . 1044 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 78 बाधितांचा मृत्यू झाला आहे . स्वब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे . गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊन तो 60 टक्क्यापर्यंत पोहोचला असून मृत्यू दर 5.5 टक्क्यावरून 2.8 टक्क्यावर आला आहे . यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे . कोरोना आजाराची लक्षणे असल्यास त्वरीत स्वब घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे . स्वब चाचण्यांची संख्या 10 हजारावर पोहोचली आहे . त्यासाठी तालुका स्तरावर मोबाईल टीम नेमण्यात आल्या आहेत तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रॅपीड अॅन्टीजन टेस्टची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे . स्वब चाचणीचे प्रमाण वाढल्याने आणि नंदुबार येथेच ...

तळोदा परिसरात युरिया खतासाठी पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा

        शहरातील खत दुकानदारांकडे सकाळी आठपासून खतासाठी शेतकरी रांगा लावत आहेत . कोणत्या दुकानावर खत मिळेल अथवा कुठे खत उपलब्ध आहे , अशी विचारणा करत सातपुड्यातील शेतकरीदेखील गर्दी करत आहेत एकीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्याचा दावा करतो , मात्र दुसरीकडे शेतक - यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे . ही वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही . त्यामुळे तालुक्यात मुबलक प्रमाणात यूरिया व इतर खते उपलब्ध व्हावीत , अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत .  तळोदा तालुक्यात १८ हजार १०५ हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे . यात शेतकरी ज्वारी , बाजरी , मका , तूर , मूग , उडीद , भुईमूग , सूर्यफूल , सोयाबीन व कापूस पिकाची लागवड करतात .  या वेळी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे . १५ जूनपर्यंत खरिपाची पेरणी दोन हजार हेक्टरपर्यंत पूर्ण झाली होती . आता जुलै उजाडला असल्याने पाऊसदेखील बऱ्यापैकी झाल्याने पेरणी जवळपास आटोपली आहे .