नंदुरबार : धुळे येथील कोबिड तपासणी प्रयोगशाळेवर पडणारा ताण आणि जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नंदुरबारातही पुढील आठवड्यापासून कोचिङ तपासणी प्रयोगशाळा सुरू होत आहे . त्यासाठी लागणारी टूनट हे उपकरणदेखील रविवारपर्यंत येथे पोहचणार आहे . या बाबीला खासदार डॉ.हीना गावीत यांनीही दुजोरा दिला . नंदुरबारात कोविड तपासणी प्रयोगशाळा यापूर्वीच मंजूर आहे . परंतु ती सुरु करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री येथे उपलब्ध नव्हती त्याकरिता पाठपुरावा सुरु होता . गेल्या दिवसात धुळे येथील प्रयोगशाळेतून जिल्ह्यातील एकहीं स्वेब तपासणी झाली नाही . त्यामुळे ओरड झाली . संशयित रुग्णांमध्ये चलबिचलता निर्माण झाली . क्यारंटाईन केलेल्या लोकांचेदेखीलस्वॅब घेतले गेले नाहीत . त्यामुळे नंदुरबारात स्वब तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी , अशी मागणी जोर धरू लागली होती . नंदुरबारला प्रयोगशाळा सुरु करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे . कोविड तपासणीसाठी लागणारे उपकरण अर्थात टूर्नेट मशीन हे नंदुरबारसाठी रवाना झाले आहे . रविवारपर्यंत हे मशीन येथे उपलब्ध होईल . प्राथमिक तयारीनंतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊन मंगळवार किंवा बुधवारपासून येथे कोविड तपासणीला सुरुवात होणार आहे . याबाबत खासदार डॉ.हीना गावीत यांनीदेखील त्याला दुजोरा दिला असून लवकरात लवकर स्वय तपासणी सुरू व्हावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले . त्यामुळे धुळे किंवा इतर ठिकाणी स्वब तपासणीसाठी पाठविण्याची गरज राहणार नसल्याचे सांगण्यात आले .
• रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत कडक संचारबंदी • सकाळी ९ वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना अनुमती • वैद्यकिय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे सुरु सर्व प्रकारची दुकाने , पेट्रोलपंप आदि आस्थापना या दिवशी बंद अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी जिल्हाधिकारी - डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन.
Comments
Post a Comment