Skip to main content

जिल्ह्यातील चार शहरात आठ दिवस कडक संचारबंदी नंदुरबार : 22 जुलै 2020

  जिल्ह्यातील नंदुरबार शहादा , तळोदा , नवापूर या चार नगरपालीका / नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत चारही शहरात 22 जुलैच्या रात्री 12 वाजेपासून ते 30 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत . दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती राहील . वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील . सर्व प्रकारची दुकाने , सर्व खाजगी आस्थापना बंद राहील . शासकीय कार्यालये या कालावधीत सुरु राहील . या चारही शहरात केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा असेल . मात्र यासाठी रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे .

Comments

Popular posts from this blog

आज 308 व्यक्ती कोरोनामुक्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ नंदुरबार ( जिमाका वृत्तसेवा ) दि . 3 : सप्टेंबर 2020

कोरोनाबाधिताना वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून आज दिवसभरात 308 बाधित उपचाराअंती बरे होऊन घरी परतले . बुधवारी देखील 123 बाधितांना कारोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते . जिल्ह्यात आतापर्यंत 2833 कोविड पॉझिटीव्ह आढळले असून त्यापैकी 1706 बरे झाले आहेत . 1044 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 78 बाधितांचा मृत्यू झाला आहे . स्वब चाचणी वाढल्याने मृत्यू दरातही सुधारणा होत आहे . गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊन तो 60 टक्क्यापर्यंत पोहोचला असून मृत्यू दर 5.5 टक्क्यावरून 2.8 टक्क्यावर आला आहे . यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रशासन स्तरावर करण्यात येत आहे . कोरोना आजाराची लक्षणे असल्यास त्वरीत स्वब घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे . स्वब चाचण्यांची संख्या 10 हजारावर पोहोचली आहे . त्यासाठी तालुका स्तरावर मोबाईल टीम नेमण्यात आल्या आहेत तीव्र लक्षणे असणाऱ्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रॅपीड अॅन्टीजन टेस्टची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे . स्वब चाचणीचे प्रमाण वाढल्याने आणि नंदुबार येथेच ...

नंदूरबार मध्ये रविवारी कडक : संचारबंदी

 • रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत कडक संचारबंदी  • सकाळी ९ वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना अनुमती  • वैद्यकिय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे सुरु सर्व प्रकारची दुकाने , पेट्रोलपंप आदि आस्थापना या दिवशी बंद अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्या विरोधात कडक कारवाई नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी जिल्हाधिकारी  -  डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन.

तळोदा परिसरात युरिया खतासाठी पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा

        शहरातील खत दुकानदारांकडे सकाळी आठपासून खतासाठी शेतकरी रांगा लावत आहेत . कोणत्या दुकानावर खत मिळेल अथवा कुठे खत उपलब्ध आहे , अशी विचारणा करत सातपुड्यातील शेतकरीदेखील गर्दी करत आहेत एकीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्याचा दावा करतो , मात्र दुसरीकडे शेतक - यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे . ही वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही . त्यामुळे तालुक्यात मुबलक प्रमाणात यूरिया व इतर खते उपलब्ध व्हावीत , अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत .  तळोदा तालुक्यात १८ हजार १०५ हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे . यात शेतकरी ज्वारी , बाजरी , मका , तूर , मूग , उडीद , भुईमूग , सूर्यफूल , सोयाबीन व कापूस पिकाची लागवड करतात .  या वेळी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे . १५ जूनपर्यंत खरिपाची पेरणी दोन हजार हेक्टरपर्यंत पूर्ण झाली होती . आता जुलै उजाडला असल्याने पाऊसदेखील बऱ्यापैकी झाल्याने पेरणी जवळपास आटोपली आहे .