जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहादा शहर चार दिवस लॉक डाऊन तर नवापूर शहरात सोमवार पासून पुढील 14 दिवसांसाठी दुकानांची वेळ 7 ते 12.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर व जवळच्या लोणखेडा ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रतिबंधक उपाय योजनेचा भाग म्हणून 5 जुलै ते 8 जुलै दरम्यान शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने बंद करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिले आहेत. तर नवापूर शहरात एक रुग्ण आढळल्याने दोन दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून पुढील पंधरा दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते बारा या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश नवापूर तालुका प्रशासनाने दिले आहेत.
Comments
Post a Comment