जिल्ह्यातील नंदुरबार शहादा , तळोदा , नवापूर या चार नगरपालीका / नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत चारही शहरात 22 जुलैच्या रात्री 12 वाजेपासून ते 30 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत . दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती राहील . वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील . सर्व प्रकारची दुकाने , सर्व खाजगी आस्थापना बंद राहील . शासकीय कार्यालये या कालावधीत सुरु राहील . या चारही शहरात केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा असेल . मात्र यासाठी रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे .